पुणेकरांनो काळजी घ्या!! आज जीबीएसमुळे अजून एक मृत्यू, रूग्णसंख्याही वाढली, जाणून घ्या..


पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे नुसार आतापर्यंत जीबीएसमुळे ९ जणांचा बळी गेला आहे. राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या दोनशे पार गेली आहे. तर आत्तापर्यंत ११० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यातून ५४ रुग्णावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तर २० जण व्हेंटिलेटवर आहेत. गुलेन-बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराच्या रुग्णसंख्येने २००चा टप्पा ओलांडला आहे. जीबीएसची राज्यातील रुग्णसंख्या २०३ इतकी झाली आहे. यांपैकी १७९ रुग्णांची निदान निश्चिती करण्यात आली आहे.

वाघोली येथील 34 वर्षीय व्यक्तीला आधी उपाचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला 7 फेब्रुवारीपासून व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्याला ‘आयव्हीआयजी’चा डोस रुग्णालयात भरती केल्यावर 24 तासांच्या आत दिला गेला व इतर औषधेही सुरू होती, मात्र त्यांचे निधन झाले.

त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, २०३ रुग्णांपैकी ९४ रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात अजून रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

तसेच, ४१ रुग्ण पुणे मनपा, २९ रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, ३१ रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि ८ रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या 52 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आत्तापर्यंत १०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!