पुणेकरांचे बजेट कोलमडणार! CNG च्या दरात मोठी वाढ, किती वाढलेत दर? जाणून घ्या…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना आता पुन्हा एकदा महागाईची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणेकरांची चिंता वाढवणारी राहणार आहे.
याचे कारण म्हणजे महागाईने होरपळत असणाऱ्या पुण्यातील सर्वसामान्य जनतेला आता पुन्हा एकदा वाढत्या महागाईचा सामना करावा लागणार आहे. पुणे जिल्ह्यात CNG च्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. सीएनजी प्रोव्हायडर एमएनजीएलने सीएनजीच्या दरांमध्ये 1.10 रुपये प्रति किलो एवढी वाढ केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सीएनजी साठी 89 रुपये प्रति किलो या दराने पैसे मोजावे लागणार आहेत.
आजपासूनच हे दर लागू होणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सीएनजीसाठी आजपासून 89 रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे आपल्या खिशाला याचा फटका बसणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 1.10 रुपयांची वाढ केली आहे.
आता CNG साठी 89 रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणेकरांनी कंपनीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. यामुळे इतर गोष्टी देखील महागतील.
दरम्यान, या दरवाढीमुळे सीएनजी कार असणाऱ्या वाहनधारकांचा आर्थिक खर्च वाढणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात इतरही गोष्टींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक गोष्टीचे दर वाढण्याची शक्यता आहे.