पुणे जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जाहीर ! हवेलीतील उरुळीकांचन , लोणी काळभोर गटांत अनुसुचित जातीसाठी राखीव …


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सदस्य पदांसाठीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन आता गटनिहायआरक्षित आणि सर्वसाधारण जागांचे वर्गीकरण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्ग अशा चार मुख्य प्रवर्गामध्ये या जागांच वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गटांसाठी हे आरक्षण संगणक या यादृच्छिक पद्धतीने ठरवण्यात आले असून प्रशासनाने पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला आहे.

अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षित गट; लासुरणे, वालचंदनगर, गुणवडी,लोणी काळभोर

अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षित गट: निरा वागज, गोपाळवाडी,उरुळी कांचन या गटामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देण्यात आले असून,महिलांसाठी राखीव गटामुळे ग्रामीण महिलांना राजकीय क्षेत्रात पुढे येण्याची मोठी संधी मिळणार आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला आरक्षित गट: बारव, शिनोली, डिंगोरे

अनुसूचित जमाती सर्वसाधारण आरक्षित गट: वाडा टाकवे, बुद्रुक

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित गट: नारायणगाव,निरा शिवतक्रार,थेऊर,पळसदेव,कडूस,राजुरी, सुपा, ओतुर, बोरी,बुद्रुक न्हावरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण.. पेरणे, पौंड, वेल्हे बुद्रुक,मेदनकरवाडी,पिरंगुट, मांडवगण, फराटा,यवत,अवसरी बुद्रुक वेळू

सर्वसाधारण प्रवर्ग महिला आरक्षण गट: रेटवडी,पाटस,वडगाव निंबाळकर, तळेगाव ढमढेरे,निमगाव केतकी, खडकाळे, कळंब, वरवंड,शिक्रापूर ,घोडेगाव, इंदोरी, खेड, शिवापूर,पाईट,भिगवन, रांजणगाव गणपती,कुरुळी,सोमटणे,भावडा, गराडे,कोरेगाव मुळ

सर्वसाधारण- आळे, सावरगाव,पारगाव तर्फ अवसरी बुद्रुक, कवठे येमई,पाबळ,मांडवगण,नाणेकरवाडी,कुसगाव बुद्रुक, हिजवडी, खडकी, बोरी, पारधी, बेलसर वीर, विझर, भोगावली,भोलावडे, उतरली पांणदरे, निंबूत,वडापुरी काठी बावडा.

या गटावर सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर काही गटांमध्ये जोरदार चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!