पुणे जिल्हा परिषदेला खेड, जुन्नर व शिरुरचा पत्ता कट! मावळ, वेल्हे, हवेली व इंदापूरला संधी…


पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापती पदासाठी अखेर मावळ, वेल्हे,हवेली आणि इंदापूर या तालुक्यातील सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तर खेड ,शिरुर व जुन्नरचा पत्ता कट झाला आहे.

त्यानुसार महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या अंकिता पाटील यांची तर, समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी हवेली तालुक्यातील उरुळीकांचन जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जितेंद्र बडेकर , मावळच्या दिपाली हुलावळे यांना बांधकाम सभापती पदाची लॉटरी लागून नाराज झालेल्या विक्रम खुटवड यांनी कृषी व पक्षुसंवर्धन सभापतीपद नाकारल्याने अमोल नलावडे यांना संधी मिळाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीच्या सभापतीच्या निवडीमध्ये ऐनवेळी बारामतीसह खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्याचा पत्ता कट झाला आहे. मावळच्या दिपाली हुलावळे, वेळेच्या अमोल नलावडे, इंदापूरच्या अंकिता पाटील आणि हवेलीच्या जितेंद्र बडेकर यांना सभापती पदासाठी संधी मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नवनिर्वाचित सभापतीपैकी अनुक्रमे अमोल नलावडे व अंकिता पाटील हे दोन सभापती दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत. दीपाली हुलावळे आणि जितेंद्र बडेकर हे पहिल्यांदाच पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत.

यानुसार इंदापूरच्या अंकिता पाटील आणि हवेलीच्या जितेंद्र बडेकर या दोन्ही सभापतींना येत्या १६ एप्रिलला विषय समित्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्हा परिषदेत मावळ, वेल्हे,हवेली, इंदापूर या तालुक्यांचा प्रभाव वाढला असून बारामती ऐवजी इंदापूरने बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!