काय सांगता! पुण्यातील महिलेने गुप्तांगात लपवले २० लाखांचे सोने, कस्टम विभागाने महिलेला केली अटक..

पुणे : सध्या देशातील अनेक विमानतळावर वेगवेगळ्या प्रकारे कस्टम विभागाकडून कारवाई केली जात आहे. असे असताना आता ४१ वर्षीय महिलेने दुबईतून पुण्यात येताना चक्क २० लाख रुपये किंमतीचे अर्धा किलो सोने प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवून आणले होते.
ही संशयास्पद तस्करी लक्षात आल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील ही महिला दुबईहून पुण्याकडे स्पाईसजेट विमानाने येत होती.
पुणे विमानतळावर आल्यानंतर तिची तपासणी करताना कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. यावेळी तिला बाजूला करत चौकशी आणि तपासणी करण्यात आली.
त्यांनी तिची तपासणी ग्रीन चॅनेलमधून केली आणि तेव्हाच तिने शरीरात काहीतरी लपवून आणल्याचे लक्षात आले. जेव्हा महिला अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली, तेव्हा तिने गुप्तांगात लपवून ठेवलेल्या सोन्याच्या कॅप्सूल दिसून आल्या.
४११ ग्रॅम वजनाच्या २० कॅप्सूल तिने गुप्तांगात दडवल्या होत्या. यामुळे अधिकारी देखील हादरून गेले होते. याबाबत आता तिची चौकशी सुरू असून तिला ताब्यात घेतले आहे.