पुण्यातील लग्नाची राज्यात चर्चा! राम आणि श्याम अडकले विवाहबंधनात, फोटो व्हायरल….

पुणे : पुणे शहरात राम आणि श्याम या समलैंगिक जोडप्याने पारंपरिक पोशाखात विवाहबद्ध होत एक सुंदर उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. सध्या याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नसोहळा केवळ दोन व्यक्तींमधील प्रेमाचा उत्सव नव्हता, तर तो समलैंगिक समुदायासाठी प्रेरणा ठरला आहे.
त्यांच्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं असून, शुभेच्छांचा वर्षावही केला आहे. पुण्यात श्रीराम श्रीधर आणि श्याम कोन्नूर यांनी विवाहबद्ध होत आपल्या प्रेमाची एक अनोखी आणि प्रेरणादायी कहाणी घडवली. खास फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या फोटोशूटमध्ये पारंपरिक धोतर-कुर्ता, फुलांची माळ आणि मंगलाष्टकाच्या पार्श्वभूमीने भरलेल्या क्षणांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. लग्नसोहळा केवळ दोन व्यक्तींमधील प्रेमाचा आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो समलैंगिक समुदायासाठीही मोठी प्रेरणा ठरला आहे. या धाडसी निर्णयामुळे समाजातील अनेकांना नवीन दृष्टीकोन आणि स्वीकृतीचा संदेश मिळाला आहे.
फोटोमध्ये दोघांनी पारंपरिक पांढऱ्या आणि सोनेरी बॉर्डर असलेल्या धोतर-कुर्ता लूकमध्ये हजेरी लावली आहे. दोघांच्याही पोशाखात मराठमोळ्या पारंपरिकतेचा आणि आधुनिक सौंदर्यशैलीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रेमाचा आणि साहसाचा मनापासून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, पुणे शहराने पुन्हा एकदा आपली प्रगतीशील आणि समावेशक ओळख अधोरेखित केली आहे. राम आणि श्याम या समलैंगिक जोडप्याने पारंपरिक पोशाखात विवाहबद्ध होत एक सुंदर उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील अशा प्रकारे लग्न होतील, या पोस्टवर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.