पुणेकरांनो आता ‘चांद्रयान 3’ चे लॅंडिंग पाहण्यासाठी खास सोय, जाणून घ्या आणि व्हा सुवर्ण क्षणाचे साक्षीदार..
पुणे : आज देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण चांद्रयान ३ ही मोहिमेचा आज महत्वाचा टप्पा आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चांद्रभूमीला स्पर्श करेल. लँडिंगच्या दोन तासआधी लँडिंग मॉड्युलची तपासणी केली जाईल. नंतर हे यान लँड होईल.
हे लँडिंग पाहण्यासाठी अवघे भारतीय उत्सुक आहेत. पुणेकरांसाठी एक सुवर्णसंधी असून ‘चांद्रयान ३’ चं लॅन्डिंग पाहता येणार आहे. हे लँडिंग पाहण्यासाठी ठिकठिकाणी सोय करण्यात आली आहे.
पुणेकरांसाठीही खास सोय करण्यात आली आहे. पुण्यात ठिकठिकाणी चांद्रयान ३ चं लँडिंग पाहण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी सोय करण्यात आली आहे.
काही शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि खासगी संस्थांमध्येही आयोजन करण्यात आलं आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनसीआरए’ सभागृहात संध्याकाळी ६ वाजता मोठ्या पडद्यावर हे लँडिंग पाहण्याची सोय करण्यात आली आहे.
तसेच सदाशिव पेठेतील टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही हजारो विद्यार्थ्यांना ‘चांद्रयान ३’ चं लँडिंग लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. या ठिकाणी दुपारी ४ वाजल्यापासून ते ७ वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल. लॉ कॉलेज रोडवरच्या एनएफएआय या संस्थेमध्येही चांद्रयान ३ चं लँडिंग पाहता येणार आहे.
दरम्यान, पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्कुलमधील विद्यार्थ्यांना चंद्रयान 3 चे लँडिंग पाहण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. इथेही हे लँडिंग दाखवण्यात येणार आहे.