पुणे हादरलं! प्रियकरांन प्रेयसीला आधी संपवलं अन् मग तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातुन गुन्हेगारी वृत्तीच्या घटना समोर येत आहेत.अशातच आता पुन्हा एकदा पुण्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. तरुणाने आधी तरुणीची हत्या केली आणि नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दरम्यान या तरुणाने तरुणीची हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्प्ष्ट होऊ शकलेलं नाहीये. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील संगमवाडी परिसरात तरुणाने आपल्याच मैत्रिणीची हत्या केली, त्यानंतर त्याने तळेगाव येथे जाऊन स्वत:ही आत्महत्या केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण गणेश काळे आणि दिव्या हे दोघेही पुण्यातील ससून रुग्णालयात नोकरीला होते कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झालं. मात्र या काही दिवसापासून त्या दोघांमध्ये वाद वाढले होते.या वादग्रस्त तणावात असलेल्या गणेशने टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे..

आरोपी तरुण गणेश काळे हा मुळ बीडचा रहिवासी आहे, तर ही तरुणी पुण्यातीलच रहिवासी होती.. प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झालं असावं असा संशय पोलिसांना आहे, या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून दिव्याची हत्या करून गणेश पळून गेला असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत होता. त्याचवेळी पिंपरी परिसरात गणेश काळे यांचा मृतदेह सापडला आणि त्यांन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपास स्पष्ट झाले
