पुणे हादरलं! चारित्र्याचा संशय झाला असह्य ; समाजसेविकेने नवऱ्याचा घरातच काढला काटा, केलं भयानक कृत्य..


पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी घटना वारंवार वाढताना दिसत आहे.
अशातच आज पहाटे पुणे जिल्ह्यातील चिंचवड भागात चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा आवळून खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ता चैताली नकुल भोईर (वय 28 वर्ष)आणि पती नकुल भोईर (वय 40 वर्ष )दोघे मिळून साडी सेंटर चालवत होते. चैतालीला भविष्यात नगरसेविका व्हायचे होते. ती समाजसेवेमध्येही सक्रिय होती. मात्र पती वारंवार तिच्यावर संशय घ्यायचा.यावरून त्या दोघांच्यामध्ये वारंवार वाद होत असत.आज पहाटे पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद तितका टोकाला गेला की,वादाच्या भरात संतापलेल्या चैतालीने घरातील कपड्याने पतीचा गळा आवळून खून केला. घटनेच्या वेळी दोघांची दोन आणि पाच वर्षांची मुलं घराच्या आत झोपलेली होती. त्यावेळी बाहेरच्या खोलीत ही संपूर्ण घटना घडली.या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पत्नी चैताली भोईर हिला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान ही घटना आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. महिलेने कपड्याने गळा आवळून पतीचा खून केला. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोसावी यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे..

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!