भरदिवसा घरात घुसून माय-लेकरावर धारदार शस्त्राने हल्ला, भयंकर घटनेने पुणे हादरलं…


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

तसेच येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. चार तरुणांनी थेट घरात घुसून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने जबर मारहाण केली.

या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, परिसरात दहशतचे वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत रहीसा महंमद शेख (वय 44, रा. स.न. 10, कामराजनगर, येरवडा) फिर्याद दाखल केली आहे.

       

रहीसा शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जहुर शेख (वय 28), सुलतान खान (वय 20), आझाद खान (वय 22) आणि मुस्तफा खान (वय 21) हे चारही आरोपी रविवारी सकाळी अचानक त्यांच्या घरात घुसले.

कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ‘माझ्या आईला का मारले?’ असा प्रश्न विचारत आरोपी जहुर शेख याने तलवार काढून रहीसा यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर त्यांचा मुलगा साजिद शेख यालाही तलवारीने वार करून गंभीर जखमी केलं.

हल्ल्याच्या वेळी इतर आरोपींनी घरात घुसून फर्निचर फोडलं, वस्तूंचं नुकसान केलं आणि गलिच्छ शिवीगाळ करत महिलेला धमक्या दिल्या. काही मिनिटांतच घरात हाणामारीचा थरार सुरू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली तेव्हा घरात रक्ताचे थारोळे आणि तोडफोड झालेल्या वस्तू पाहून धक्का बसला.

यानंतर घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले असून, दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी जहुर शेख, सुलतान खान, आझाद खान आणि मुस्तफा खान या चार आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!