पुणे हादरलं! बुधवार पेठेत चिठ्ठी लिहून तरूणीची ९व्या मजल्यावरून थेट उडी,आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

पुणे : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात 19 वर्षीय तरुणीने इमारतीतील नव्या मजल्यावरून थेट उडी मारून आपलं आयुष्य संपवल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ही तरूणी नेमकी कोण? तरूणीनं टोकाचं पाऊल का उचललं? तरूणीसोबत नेमकं घडलं काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना सुसाईड सापडली आहे. या सुसाईड नोटमधून सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानसी (वय वर्ष १९) असे मृत तरूणीचे नाव आहे. तिनं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमधून तिनं आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.तरूणीनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, ‘मी माझ्या घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. मी स्वत:हून टोकाचं पाऊल उचलत आहे. मला या कामाचा कंटाळा आल्यामुळे स्वत:हून आयुष्य संपवत आहे’, असं सुसाईड नोटमध्ये लिहून तिनं आयुष्य संपवलं. तिनं इमारतीतील ९ व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवलं.
या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले
दरम्यान मृत तरूणी मागील काही दिवसांपासून याच इमारतीमध्ये वास्तव्यास होती. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणले असून, सध्या पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

