Pune : शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणास १८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ…


Pune : आधार प्रमाणीकरण नसल्याने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याची मुदत १८ सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक २७/१२/२०१९ अन्वये राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना कार्यन्वीत ‘केलेली असून. त्याअंतर्गत २९/०७/२०२४ रोजी शासन निर्णय निर्गमीत करून नियमीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांकरीता प्रोत्साहनपर लाभ योजना जाहिर कण्यात आली.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण न केलेल्या पुणे जिल्हयातील ११२१ शेतक-यांसाठी आधार प्रमाणिकरणाची सुविधा दिनांक १२/०८/२०२४ ते ०७/०९/२०२४ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, पुणे जिल्हयातील अद्याप ६४८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही.

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालनयीन पत्र क्र. कृषीपत-११/प्रोअयो/आधार प्रमा/२३४४/२०२४ दि. ०९/०९/२०२४ चे पत्रान्वये सदर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा दि. १८/०९/२०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. Pune

दरम्यान, उवरीत पात्र लाभार्थी शेतक-यांनी आपले सरकार केंद्र/ सीएसी केंद्र/पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आपल्या जवळची शाखा येथे जावून आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. असे आवाहन पुणे जिल्हा बँकेच्या ग्रामीण विभागाचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले आहे.

तसेच विषयांकीत योजनेच्या कालावधीत बँकांकडुन पीक कर्ज घेऊन नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच निधन झाल्याने त्यांना प्रोत्साहनपर लाभ रक्कम अदा करता आली नाही, अशा मयत शेतक-यांच्या कर्जखात्याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत महा-आयटी कडुन आदर्श कार्यपद्धती प्राप्त झालेली आहे.

त्या कार्यपद्धतीनुसार मयत शेतक-यांच्या कर्जखात्याची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरुन काढून टाकण्याची सुविधा बँकांना दिनांक ०९.०९.२०२४ ते दिनांक १७/०९/२०२४ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.

वारसांची नोद संबंधीत कर्जखात्यास करुन त्याबाबतची माहिती संगणकीय मयत शेतकऱ्यांच्या प्रणालीवर सादर करण्याची सुविधा दिनांक १८/०९/२०२४ ते दिनांक २६/०९/२०२४ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.

दरम्यान, मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी त्यांचे कागदपत्रे संबंधीत बँकेत विहीत कालावधीत सादर करावी व आपल्या वारसाची नींद करून घ्यावी, असे आवाहन पुणे जिल्हा बँकेच्या ग्रामीण विभागाचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!