शिवजयंतीनिमित्त आज पुण्यातील वाहतूकीत बदल, जाणून घ्या…


पुणे: आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह लष्कर, खडकी भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे. यामुळे याठिकाणी कोणी जात असेल तर वाहतुकीचा बदल जाणून घेणे आवश्यक आहे.

मुख्य मिरवणूक भवानीमाता मंदिर येथून सुरू होऊन भवानी पेठमार्गे रामोशी गेट चौक, नेहरू रोडने हमजेखान चौकापासून पुढे सोन्या मारुती चौक, फडके हौद चौकातून जिजामाता चौकमार्गे लालमहल चौक येथे विसर्जन होणार आहे. त्यामुळे नेहरू रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर पॉवर हाऊसकडून सेव्हन लव्हजकडे जाणा-यांनी क्वार्टर गेट चौकातून जावे.

तसेच लक्ष्मी रोडवरील वाहतूक बंद आहे. यामुळे टिळक चौकाकडे जाणा-यांनी नेहरू रोड पॉवर हाऊस चौक येथून जिजामाता चौकमार्गे पुढे जावे. तर, देवजी बाबा चौकाकडून मिठगंज चौकमार्गे स्वारगेटकडे जाणा-यांनी देवजीबाबा चौक ते दारुवाला पुलापासून पॉवर हाऊस चौकातून नेहरू रोडचा वापर करावा.

दरम्यान, मिरवणूक पुढे जाईल तसतशी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. खडकी बाजार येथील शिवाजी पुतळा येथून सुरू झालेली मिरवणूक कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल चौक, तालीम चौकापासून पुढे महाराष्ट्र बँकमार्गे शिवाजीपुतळा येथे विसर्जित होणार आहे.

फडके हौद चौक पास होईपर्यंत केळकर रोडने बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिरमार्गे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार अप्पा बळवंत चौकातून वळवून बाजीराव रोड, शिवाजी रोडमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!