स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील मार्केट यार्ड राहणार बंद, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’
पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्केट यार्ड येत्या मंगळवारी (ता. १५) बंद ठेवण्यात येणार आहे, असे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी जाहीर केले आहे.
येत्या मंगळवारी मार्केट यार्डातील मुख्य बाजार, मोशी उपबाजार, मांजरी उपबाजार, उत्तमनगर उपबाजार, खडकी उपबाजार बंद राहणार आहे.
तसेच शेतकऱ्यांनी मंगळवारी शेतमाल विक्रीस बाजारात आणू नये. मार्केट यार्ड बंद राहणार असल्याची नोंद व्यापारी, व्यावसायिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्ड येथील फळे-भाजीपाला विभाग, केळी बाजार, गुरांचा बाजार, गुळभुसार विभाग, स्थापत्य विभाग, भांडार शाखा, छापाई लेखनसामुग्री, भुईकाटा केंद्र, पेट्रोलपंप विभाग, फुलांचा बाजार, पान बाजार, माती पाणी परिक्षण व अन्न भेसळ प्रतिबंधक प्रयोगशाळा बंद राहणार आहेत.