Pune To Ayodhya Train : श्रीराम भक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून अयोध्येला जाण्यासाठी १५ विशेष रेल्वेगाड्या, जाणून घ्या वेळ..
Pune To Ayodhya Train : देशात सध्या सगळीकडे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची प्रतिक्षा आहे. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर नवीन मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी सुरु होणार आहे. त्यात अनेक रामभक्त अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहे.
भाविकांच्या सोयीसाठी आता पुण्यातून अयोध्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. येत्या ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या अयोध्येसाठी पुण्यातून सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांची अयोध्या वारी सोपी होणार आहे.
अयोध्याला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी राम भक्तांकडून केली जात होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने पुण्यातून ३० जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत १५ विशेष रेल्वे अयोध्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्याला जाऊ शकणार आहेत. Pune To Ayodhya Train
भारतीय रेल्वेने प्रभू रामभक्तांसाठी २०० विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. योध्येला जाण्यासाठी भाविकांनी विशेष गाड्यांची मागणी केली होती. त्यानुसार ३० जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी १५ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व गाड्या स्लीपर कोच असणार आहेत. पुणे-अयोध्या-पुणे रेल्वे सेवेसाठी तीन रॅकचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
अयोध्येहून पुण्याला जाण्यासाठी १५ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. एका गाडीतून सुमारे दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकतील. लवकरच या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे. या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्यातून नेमक्या कोणत्या गाड्या धावणार याची माहिती येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.
देशभरातून २०० विशेष गाड्या..
रेल्वे आस्था ट्रेनच्या नावाने देशभरातून २०० विशेष गाड्या धावणार आहे. यात दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, जम्मू-काश्मीर येथून अयोध्येला जाण्यासाठी आस्था स्पेशल ट्रेनची सोय करण्यात आली आहे. या ट्रेनच्या माध्यामातून लाखो लोक अयोध्येला जाऊ शकणार आहेत.