पुण्यातील शिक्षिकेची याचिका फेटाळली ; ऑपरेशन सिंदूरची खिल्ली उडवणं पडलं महागात..


पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला.त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं होतं.भारताच्या या शौर्याच सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र पुण्यातील एका महिलेने या ऑपरेशन सिंदूरची खिल्ली उडवणारा एक व्हाट्सअप स्टेटस ठेवला होता. पेशाने शिक्षिका असणाऱ्या फराह दिबा या महिलेने जळत्या तिरंग्याचे व्हाट्सअप स्टेटस ठेवून ‘ऑपरेशन सिंदूर’ची खिल्ली उडवली होती. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र आता न्यायालयानेही महिलेला दणका दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेशाने शिक्षक असणाऱ्या फराह दिबा या महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्यावरील संबंधित गुन्हे रद्द व्हावेत यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने फराह हिची याचिका फेटाळली आहे. राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होणारे संदेश हलक्यात घेऊन चालणार नाही. असं उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना म्हटल आहे. न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू होती.

याचिकाकर्त्या शिक्षिका महिलेला सीआरपीसी 41-A अंतर्गत नोटीस बजावण्यात आलेली नाही. तसेच तिला शाळेतून काढून टाकले असल्यामुळे ती तणावात होती. तिने केलेले सर्व मेसेज डिलीट केलेले आहे तसेच तक्रारदार महिलेची माफी देखील मागितली आहे’. मात्र, सरकारी वकिलाने या याचिकेवर आक्षेप घेतला. त्यानंतर न्यायालयाने ‘याचिकादार या सुशिक्षित असून त्या एक शिक्षिका आहेत. अशा व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करताना विचार करावा.त्यांच्या कृत्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे गुन्हा रद्द करणे योग्य नाही. अर्ज करण्याची तिला संधी दिली होती. तिने निकाल देण्याची मागणी केली, असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. त्यामुळे त्या महिलेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!