Pune : पुणे ड्रग्ज प्रकरणी अजून एका निरीक्षकाचे निलंबन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, आतापर्यंत ६ जणांवर कारवाई…
Pune : पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाला याप्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. अनंत पाटील यांच्यावरही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
फर्ग्युसन रस्त्यावरील लिकर लीजर लाउंज (एल थ्री) पबमधील पार्टी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पबचालक, व्यवस्थापक आणि पार्टी आयोजकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील आठ जणांना अटक केली आहे.
पार्टीमध्ये अमली पदार्थाचे सेवन करणार्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात दोन पोलिस अधिकार्यांना निलंबन करण्यात आले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका निरीक्षकाला निलंबित केल्यानंतर सोमवारी या प्रकरणात आणखी एका सह निरीक्षकाला निलंबित केले आहे. Pune
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी सह निरीक्षक अनंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. एफसी रस्त्यावरील एल थ्री बारमधील पार्टीमध्ये मद्यविक्री प्रकरणात कर्तव्यात कसुर ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विठ्ठल बोबडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
आतापर्यंत ६ जणांवर कारवाई..
पुणे एल थ्री बार पार्टी प्रकरणात पुणे पोलीस दलातील चार तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस अधिकारी आणि दोन बीट मार्शल यांना निलंबित करण्यात आले आहे.
तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने , सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस हवालदार गोरख डोहिफोडे, पोलीस शिपाई अशोक अडसूळ यांना निलंबित करण्यात आले होते. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विठ्ठल बोबडे आणि सहनिरीक्षक अनंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.