लक्झरी प्रवास ठरतोय धोकादायक ! पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरीने ट्रकला दिलेला धडकेत दोघे ठार !!


यवत : कुरकुंभ हद्दीत भरधाव लक्झरी बसने मालट्रकला जोराची धडक दिली आहे. या भीषण अपघातात दोघेजण ठार झाले तर तीनजण जखमी झाले आहे. ही घटना घडली शनिवारी(ता.६) घडली आहे..

याप्रकरणी बसचालकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूनाथ चन्नाप्पा कलबंडे (वय ५२, सध्या रा. शाहु काँलनी वेदांन्त नगरी गल्ली नं ११, कर्वेनगर पुणे – ५२, मुळ रा. बडधळ, ता. अफजलपुर, जि गुलबर्गा, रा. कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.५) फिर्यादी आणि त्यांची पत्नी देवदर्शनासाठी मल्लिकनाथमठ भिगवण (ता. इंदापुर) येथे गेले होते. शनिवारी (ता.६) देवदर्शन उरकून पुन्हा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून खाजगी लक्झरी बसने (युपी ७८ एफएन ९२५७) पुण्याला घरी जाण्यासाठी निघाले होते. कुरकुंभ गावचे हद्दीत बसचालकाने भरधाव वेगात बस चालवुन समोरील अज्ञात मालट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!