Pune : पुणे शहर पोलिसांच्या नियोजन अभावाने पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सहा तास कोंडला! लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात वाहतूक पोलिसांचा विभागच नाही..

जयदीप जाधव
Pune उरुळी कांचन : पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार( दि.१८) रोजी पुणेशहर वाहतुक पोलिसांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बुधवारी पहाटे पासून थेऊर फाटा मार्गे पुणे -नगर मार्गे वळविली असताना पुणे -सोलापूर महामार्गावर पहाटेपासून अभूत पूर्व वाहतुक कोंडीचा फटका बसला आहे.
या महामार्गावर शहर पोलिसांचे वाहतुक बंद करण्याचा नियोजनाने पुणे- सोलापूर मार्ग सुमारे सहा तास कोंडला जाऊन वाहतुकीचा फज्जा उडाला जावून या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी, शेतकरी ,कामगार वर्ग व शाळकरी मुलांना फटका बसून शाळकरी मुलांच्या बसेसची सेवा करण्याची परिस्थिती अद्भुवली आहे.
पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नित्याचीच वाहतुक कोंडी बुधवारी मात्र पुणे शहर पोलिसांच्या नियोजनाने अतिशय डोकेदुखीची ठरली आहे. पुणे शहर पोलिसांनी बुधवारी अनंत चतुर्थीनंतर वाहतुक थेऊर मार्गे नगर रोडला वळविल्याने वाहतुक कोंडीचा मोठा फटका स्थानिकांसह प्रवाश्यांना तसेच शेतकऱ्यांना बसला आहे. पुणे शहर पोलिसांनी वाहतुक बंदीची कोणतीही पूर्वसूचना न देता थेऊर फाट्यामार्गे वाहतुक बंद केली असल्याने थेऊर फाटा ते उरुळीकांचन पर्यंत सलग ६ तासाहून अधिक वेळ वाहतुक कोंडी परिस्थिती निर्माण झाली होती. Pune
त्यामुळे थेऊर फाटा ते उरुळीकांचन पर्यंत दहा किलोमीटर वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. या मार्गावर शहर पोलिसांच्या नियोजनामुळे वाहतुक तुंबल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतुक मोठ्या प्रमाणात तुंबली होती. अशातच स्थानिक वाहनांनी शिस्त न पाळल्याने सोलापूरकडे जाणाऱ्या एक पदरी मार्गात वाहनांनी उलटी वाहने घातल्याने वाहतुक कोंडीचा मोठा खेळखंडोबा उडाला होता. त्यामुळे वाहतुकीने गणपती विसर्जनानंतर गावाहून परतणाऱ्या प्रवासी, कामगार वर्ग ,शेतकरी तसेच शाळकरी बसेस यांना फटका बसून शाळकरी बसेस सेवा बंद ठेवण्याची परिस्थिती उद्भवली आहे.
दरम्यान कवडीपाट ते कासुर्डी हा महामार्ग सातत्याने वाहतुकीने तुंबत आहे. पुणे शहर पोलिसांनी गणेश विसर्जनानंतर या वाहतुकीसाठी पूर्व नियोजित करुन वाहतुक बंद करुन ती वाहतुक वळविणे गरजेची होती. मात्र वाहतुक वळविल्यानंतर माल वाहतूक ट्रक ड्रायव्हर लोकांनी महामार्गावर थांबणे पसंत केल्याने वाहतुकीचा दुपारपर्यंत बोजवारा उडाला आहे. शहर पोलिसांना वाहतुकीचा डोलारा पहाटेपासून सांभाळता न आल्याने वाहतुक कोंडीचा त्रेधातिरपीट उडाली होती.
लोणीकाळभोर पोलिसांना वाहतुक विभागच नाही…
लोणीकाळभोर पोलिस ठाणे पुणे आयुक्तालयात गेल्याने पुणे -सोलापूर महामार्गावरील कवडीपाट ते सोरतापवाडी पर्यंत वाहतुकीचे नियोजन शहर पोलिसांकडे आहे. तर सोरतापवाडी ते उरुळीकांचन पर्यंत पुणे ग्रामीण पोलिसांची हद्द असल्याने ही वाहतुकीचे नियोजन ग्रामीण पोलिसांचे आहे. मात्र लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात वाहतुक विभाग कार्यरत नसल्याने हडपसर वाहतुक पोलिसांच्या वतीने किर्लोस्करपूल ते सोरतापवाडीपर्यंत वाहतुक हडपसर पोलिसांनी करावे लागत आहे. परंतु हडपसर पोलिस लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांभीर्याने पाहत नसल्याने परिस्थिती आहे.