पुणे हादरलं! नराधम बापाकडून पोटच्या पोरीवर ८ महिने अत्याचार, घटनेने खळबळ..

पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले आहे. ही घटना नांदेड सिटी परिसरात घडली आहे. जवळपास ८ महिने अत्याचार सुरू होता.
नराधम बापाने आपल्या १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत नात्याला काळीमा फासला आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस स्टेशनमध्ये ४५ वर्षीय नराधम बापाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी परिसरात १४ वर्षांच्या मुलीवर बापानेच लैंगिक अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल ८ महिने बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार केला जात होता. हा संपूर्ण प्रकार बाल हक्क समितीने उघडकीस आणला आहे.
त्यानुसार नांदेड पोलिसांनी ४५ वर्षीय नराधम बापाला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंगाची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.