Pune : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत धक्कादायक घटना, तीन जणांचा जागीच मृत्यू, नेमकं घडलं काय?


Pune : राज्यात घरोघरी आणि मंडळात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाने १० दिवस पाहुणचार घेतला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले होते.

मात्र आता गणपती विसर्जनला मोठे गालबोट लागले आहे. पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाने ही माहिती दिली आहे.

नयन ढोके (वय.२७), विशाल बल्लाळ (वय.३५) आणि ४५ वर्षीय एक अनोळखी व्यक्ती अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांचा मृत्यू अनुक्रमे लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कसबा गणपती मंडळाजवळ झाला. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. Pune

सध्या ससून रुग्णालयाने या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आता हा अहवाल आल्यानतंर या तिघांचा मृत्यू कोणत्या कारणांनी झाला याबद्दलची माहिती समोर येईल, असे ससून रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!