पुणे हादरलं ; बाप -लेकाकडून विटासह दांडक्याने मारहाण करत महिलेची हत्या, मृतदेह 3 दिवस घरातच लपवला अन….


पुणे : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी वृत्तीच्या घटना वाढतच चालल्या आहेत.अशातच आता पुण्यात आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. बाप लेकाच्या जोडीने मिळून एका महिलेची वीट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजे या महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घरातच ठेवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संबंधित आरोपींना ताब्यात घेतल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरातील महिलेच्या हत्ये प्रकरणी संशयित रवी रमेश साबळे (वय ३५) आणि रमेश रामचंद्र साबळे (वय ६५) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांचीही चौकशी केली असता या दोघांनीही महिलेच्या हत्येची कबुली दिली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी आणि आरोपी रमेश या दोघांनी मिळून महिलेला तीन दिवसांपूर्वी वीट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन तिची हत्या केली. मात्र एवढ्यावरच न थांबता या दोघांनी महिलेचा मृतदेह घरामध्ये लपवुन ठेवला होता.त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव स्मशानभुमी परिसरात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता लाईट बंद असलेली संशयास्पद रिक्षा दिसुन आली. त्या अनुषंगाने लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी आणि येरवडा या भागातील रिक्षा गेलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

. दरम्यान या बापलेकाच्या जोडीने या महिलेची हत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तसेच ही महिला कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!