Pune : साहेब खासदार अन् बापटांच्या सुनबाईं दिसल्या सुत्रसंचालकाच्या भूमिकेत, पुण्यात नेमकं काय घडलं?
Pune : भाजपाचे निष्ठावंत तत्कालीन खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांचे नाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवारीसाठी नेहमी घेतले जात होते. तसेच स्वरदा बापट काल माजी महापौर आणि लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महायुतीचे अन्य उमेदवार यांच्या साठी पंतप्रधान मोदींच्या सभेचे सूत्र संचालन करताना दिसल्या.
गिरीश बापट यांच्यासह योगेश गोगावले,विजय काळे,सुहास कुलकर्णी अशा जुन्या भाजपच्या रथी महारथींची नावे कुणाला माहितीत नाहीत.भाजपचा घडत्या काळात टाक्याचे घाव सोसलेल्या अनेकांना कालचे मोदींचे भाषण कसे वाटले? हा प्रश्न औत्सुक्याचा वाटणार आहे. पण मोदींच्या भाषणात स्वतः मोदींनी स्वतःचे नाव अनेकदा उच्चारले हे राजकीय समीक्षकांच्या ऐकण्यातून सुटले तर नवलच.
तुमच्या घरातील ७० वर्षाच्या पुढील ज्येष्ठांच्या औषधांची काळजी मोदी घेईल. मोदी हे करेल, मोदी ते आहे ना? अशी अनेक आणि काही बॉलीवूड स्टाईलची वाक्ये प्रेक्षक आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करत होती मात्र यावर यांना ग ची बाधा तर झाली नाही ना?, अशी शंका काहींना चाटून जात होती. Pune
भाजप पार्टीच्या पेक्षा मोदींच्या नावाचा गवगवा या सभेत जास्त होत होता.यामुळे पार्टी पेक्षा मोदी यांना जास्त वयक्तिक सापेक्ष जास्त महत्व प्राप्त झाल्याचे जणू अधोरेखित होत होते.