Pune Ring Road : पुणे रिंग रोडसहित महाराष्ट्रातील ‘या’ दोन महामार्गांचे काम लोकसभा निवडणुकीनंतर होणार सुरु, जाणून घ्या सविस्तर…


Pune Ring Road : पुणे रिंग रोड संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. खरं तर महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

यातील काही महामार्गाची कामे सुरू आहेत तर काही मार्गांची कामे लवकरच सुरू होणार आहे. सध्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गाचे काम केले जात आहे. समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर लांबीचा असून यापैकी ६२५ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे आणि त्यावरून वाहतूक देखील सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे उर्वरित ७६ किलोमीटर लांबीचे काम देखील जुलै २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. याशिवाय राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तीपीठ महामार्ग तयार केला जाणार असून याला नुकतीच शासनाची मंजुरी मिळाली आहे. Pune Ring Road

त्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे यादेखील मार्गाचे काम नजीकच्या भविष्यात सुरू होण्याची आशा आहे. तसेच दुसरीकडे पुणे रिंग रोड, विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर आणि जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकल्पांचे काम येत्या काही महिन्यांमध्ये सुरु होणार असा अंदाज आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या तिन्ही प्रकल्पांसाठी एमएसआरडीसी ने काढलेल्या स्वारस्य निविदेला २८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. यापैकी १९ कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या होत्या. यानुसार या इच्छुक कंपन्यांनी आर्थिक निविदा सादर केल्या आहेत.

दरम्यान या सादर झालेल्या निविदा काल उघडल्या गेल्या आहेत. या ३ प्रकल्पांच्या २२ पॅकेजेसाठी एकूण ८२ निविदा सादर झाल्या आहेत. आता या निविदांची छाननी करून त्या अंतिम केल्या जाणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!