Pune Ring Road : पुणे रिंगरोडसाठी १२ कंपन्या पात्र, निविदांची छाननी सुरू, रिंगरोडसाठी हालचालींना वेग…


Pune Ring Road : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी साकारण्यात येणाऱ्या सुमारे १३६.८० किलोमीटर लांबीच्या चक्राकार मार्गासाठी (रिंग रोड) देशासह परदेशातील सुमारे १२ कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.

त्या सर्व कंपन्यांनी सादर केलेल्या निविदांची तांत्रिक छाननीची प्रक्रिया राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली असून, ती पूर्ण होण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

रिंग रोड पूर्व आणि पश्चिम टप्प्यात होणार असून, त्यासाठी आतापर्यंत सुमारे ७० टक्के जमीन संपादित झाली आहे. प्रकल्पासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुरंदर, भोर, हवेली, खेड, मावळ तालुक्यांत हा रिंग रोड जात आहे. रिंग रोड नऊ पॅकेजमध्ये साकारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने रस्ते विकास महामंडळाने निविदा जाहीर केल्या आहेत. देशासह परदेशातील विविध बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. Pune Ring Road

या कामासाठी यापूर्वीच कंपन्यांची पात्रता निश्चित करण्यात आली होती. २८ कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे १९ कंपन्या पात्र ठरल्या होत्या. त्याच कंपन्यांनी नऊ पॅकेजससाठी निविदा सादर केल्या आहेत.

रिंग रोडसाठी निविदा सादर केलेल्या कंपन्यांच्या निविदांची तांत्रिक छाननीची प्रक्रिया सर्वात प्रथम पूर्ण होईल. पुढे कंपन्यांच्या निविदांची आर्थिक छाननी केली जाईल. त्यानंतर अंतिम प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल. त्यानंतर पात्र कंपन्यांना कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येतील.

दरम्यान, रिंग रोड पूर्व आणि पश्चिम टप्प्यात होणार असून, त्यासाठी आतापर्यंत सुमारे ७० टक्के जमीन संपादित झाली आहे. प्रकल्पासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!