पुणे रिंगरोडबाबत मोठा दिलासा! महत्वाचे काम लागणार मार्गी


 

उरुळी कांचन : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामाध्यमातून पुणे रिंग रोड चे काम केले जात आहे. यापैकी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून तयार केल्या जाणाऱ्या पुणे रिंग रोड बाबत आता एक मोठी माहिती हाती आली आहे.

 

सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प अहवाल तयार झाला की मग या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर पहिल्या अडीच वर्षात सोळु ते वडगाव शिंदे या अंतरातील काम केले जाणार आहे.

अहवाल तयार झाल्यानंतर यासाठीचे आवश्यक भूसंपादन केले जाणार आहे. पी एम आर डी ए चे मुख्य अभियंता अशोक भालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल मे महिन्यात सादर होणार आहे.

आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला मे महिन्यानंतर सुरुवात होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. या प्रकल्पाचे काम जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसे केले जाणार आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या रिंग रोड चे काम हाती घेण्यात आले आहे. हे दोन स्वतंत्र रिंग रोड आहेत. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!