Pune Ring Road : पुणे रिंगरोडबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय!! २० हजार कोटींच्या खर्चास मंजुरी, जाणून घ्या कधी सुरू होणार काम?

Pune Ring Road : महाराष्ट्र राज्य शासनाने पुणे रिंग रोड बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. काल राज्य मंत्रिमंडळाने पुणे रिंगरोडच्या बांधकामासाठी २०,३७५.२१ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी दिली आहे.

ज्यामुळे प्रकल्पाची एकूण किंमत ४२,७११.०३ कोटी रुपये झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी तर फुटणारच आहे शिवाय पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे. मात्र आता या प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम अजून सुरू झालेले नाही. पण, असे असतानाही केवळ तीन वर्षांत याच्या खर्चात वाढ झाली आहे. Pune Ring Road

हा प्रकल्प एकूण दोन टप्प्यात म्हणजेच पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पूर्ण होणार आहे. मंत्रिमंडळाच्या नोंदीनुसार, पुणे रिंग रोड (पूर्व) उर्से (मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग) ते सोलू (आळंदी-मरकल रस्ता) आणि सोलू ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रस्ता) पर्यंत जातो.
या ६८.१९ किमी लांबीच्या रस्त्याची किंमत सप्टेंबर २०२१ मध्ये १०,१५९.८२ कोटी रुपये एवढी होती. शुक्रवारी, प्रकल्पाची एकूण लांबी सुधारून ७२.३३५ किमी करण्यात आली आणि एकूण खर्च १९,९३२.९८ कोटी रुपये करण्यात आला आहे.
पुणे रिंग रोड (पश्चिम) उर्से (मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग) ते वरवे बुद्रुक (सातारा रस्ता) पर्यंत जातो. सप्टेंबर २०२१ मध्ये, प्रकल्पाच्या या टप्प्याची किंमत अंदाजे १२,१७६ कोटी रुपये होती. पण आता पश्चिम रिंग रोडची किंमत २२,७७८.०५ कोटी रुपये झाली आहे.