पुणेकरांचा प्रवास होणार वेगवान! दोन नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी, जाणून घ्या….


पुणे : सध्या पुणेकरांसाठी एक आनंदाची समोर आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. रेल्वे विभागाने पुण्याला जोडणाऱ्या दोन नव्या सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे.

या निर्णयामुळे पुणे, गोंदिया, रेवा, जबलपूर आणि रायपूर या शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडही राज्ये दोन नवीन एक्सप्रेस ट्रेनमुळे जोडले जाणार आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी प्रवाशांनी वेळोवेळी मागणीनंतर पाठपुराव्यानंतर या एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी या दोन नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसमुळे मोठ्या प्रमाणावर सुधारणार आहे. नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना याचा विशेष फायदा होणार आहे.

दरम्यान, या एक्सप्रेस ट्रेनमुळे दळणवळण, व्यापार, पर्यटन आणि सामाजिक संबंधांनाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रवाशांच्या मागणी आता अखेर पूर्ण झाली आहे. यामुळे आता प्रवाशांना फायदा होणार आहे.

जबलपूर-रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेसः ही एक्सप्रेस जबलपूर -नैनपूर – बालाघाट – गोंदिया – रायपूर या मार्गावर धावेल. तसेच रेवा-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी रेवा – सतना -जबलपूर – नैनपूर – बालाघाट – गोंदिया – नागपूर – पुणे या -मार्गाने धावणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!