पुणेकरांनो सावधान! गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, 59 रुग्णांना लागण, प्रशासन अलर्टवर, अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय…


पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढलेला आहे. आता रूग्णांची संख्या ही 22 वरून 59 पर्यंत गेली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे आता शहरात आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याचे बघायला मिळतंय. याबाबत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे.

महानगरपलिका देखील कामाला लागली आहे. झपाट्याने वाढत असलेल्या रूग्णांमुळे टेन्शन वाढले आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, या आजाराबद्दल आढावा घेतला आहे. या आजाराबद्दल चर्चा देखील झाली. हा संसर्गजन्स रोग नाही. मी डॉक्टरांना पण सांगितले, सिव्हिल सर्जनला पण सांगितले, बाकी जिल्हाधिकारी, सीईओ आणि इतरही अधिकारी होते.

काळजी घेणे हे सर्वात महत्वाचे आहे. आजाराबद्दल वेगवेगळी चर्चा होती, अफवा होती. मी प्रेस नोट्स काढण्याची सूचना त्याबद्दल केली आहे. प्रशासनाकडून या गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराच्या विरोधात पाऊले उचलली जात आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.

बहुतेकजण पुण्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. नागरिकांना काळजी घ्यावी, यासोबतच प्रशासनाकडून या आजाराच्या विरोधात पाऊले उचलली जात आहेत. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण बघायला मिळतंय. अगोदर संख्या ही 34-35 होती ती आता 59 पर्यंत गेली आहे.

दरम्यान, रुग्णांमध्ये 12 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. सिंहगड आणि धायरी परिसरात सर्वाधिक रूग्ण असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. आता पुणे महानगरपालिका देखील अलर्टवर असल्याचे बघायला मिळतंय. याबाबत प्रशासन काळजी घेत असल्याचे अजित पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!