पुणे रेव्ह पार्टी प्रकरण ; खडसेंच्या जावयाच्या अटकेमागे पोलिसांचा कट असल्याचा आरोप, खेवलकर उच्च न्यायालयात धाव घेणार..

पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांची झालेली अटक बनावट असून त्यामागे पोलिसांचा कट असल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेप्रकरणी आता वकील ठोंबरे पाटील यांनी उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे.

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात विजयसिंह ठोंबरे पाटील प्रांजल खेवलकर यांचे वकील म्हणून काम सांभाळत आहेत. खेवलकर यांच्याबाबत केलेली कारवाई ही बनावट असल्याचा आरोप करत पोलिसांनी केलेली कारवाई हा एक ट्रॅप होता. खेवलकरांना अडकवण्याचा हा नियोजित कट आहे. कोकेन ज्याच्या पर्समध्ये सापडले त्या महिलेची पाठवणीही पोलिसांनीच केली होती. याचा आम्ही तपशीलवार तपास करणार आहोत. त्यांच्या या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.आता हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडून तपास अधिक गतीने सुरू केला आहे. पोलिसांच्या तपासात हे उघड झाले आहे की, खराडी येथील स्टेबर्ड हॉटेलमध्ये एप्रिल आणि मे महिन्यातही अशाच स्वरूपाच्या ‘हाउस पार्टी’ झाल्या होत्या.
