Pune Rains : पुण्यात पूरपरिस्थिती! अजित पवार तातडीने पुण्याला रवाना, स्वतः परिस्थितीचे नियंत्रण करणार..
Pune Rains : मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्वं करणार आहेत.
Views:
[jp_post_view]