Pune Rain Update : पुणे शहरात संततधार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या..


Pune Rain Update : राज्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी धो-धो पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्यात घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर भागात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

तर आज पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. Pune Rain Update

आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी रात्रीपासून शहर परिसरात संततधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी रात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालेले दिसून आले.

शहरातील मध्य भागात पावसाचा काहीसा जोर दिसून आला, तर शिवाजीनगर परिसरात २४ तासांत सरासरी १५.५, तर चिंचवडमध्ये ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील चारही धरणांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मान्सून सुरू झाल्यापासून पुणे शहर परिसरात पहिल्यांदाच चोवीस तास पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर कमी असल्याने सोमवारी ११.५, तर मंगळवारी ४.५, असा २४ तासांत एकूण १५ मिमी पाऊस शिवाजीनगर भागात झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!