Pune Rain : पुणेकरांनो पुढील चार दिवस छत्री, रेनकोट घेऊनच घराबाहेर पडा, जिल्ह्याला पावसाचा अलर्ट, जाणून घ्या…


Pune Rain : पुणे, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर पुणे शहर परिसरात पाऊस दुपारच्या सुमारास हजेरी लावत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आले आहे.

राज्यात आगामी चार दिवसांमध्ये म्हणजेच शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे, मुंबई, पालघरसह इतर १३ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर २८ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले असल्यामुळे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. Pune Rain

त्यामुळे आज(शनिवार) ते मंगळवार, (ता.२७) ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यभरात मान्सून सक्रिय झाल्याने पुणे घाटमाथ्याला हवामान विभागाने २४ ते २७ ऑगस्ट हे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरावर क्युम्युनोलिंबस (पांढऱ्या रंगाचे बाष्पयुक्त ढग) वेगवेगळ्या ठिकाणी कमी-अधिक जमा झाले आहेत. त्यामुळे ज्या भागात हे ढग जास्त आहेत त्या ठिकाणी मुसळधार तर ज्या भागात ढग कमी आहेत तेथे कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!