पुणे रेल्वे स्थानकाहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रविवारी बंद, जाणून घ्या नवीन वेळापत्रक…


पुणे : पुण्यातून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाहून सुटणाऱ्या तब्बल १२ रेल्वे गाड्या रविवारी (ता.२०) रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

चिंचवड ते खडकी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामामुळे रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि लोणावळ्याहून पुण्याकडे येणाऱ्या अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या लोकल असणार रद्द…

पुणे-तळेगाव : सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी
पुणे-तळेगाव : सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांनी

पुणे-लोणावळा : सकाळी ६ वाजून ३० मिनिटांची, सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी, सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी, दुपारी तीन वाजता, दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी.

शिवाजीनगर-तळेगाव : दुपारी ३ वाजून ४७ मिनिटे,सायंकाळी ५ वाजून २० मिनिटे.
शिवाजीनगर-लोणावळा : सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी.

लोणावळा-शिवाजीनगर : सकाळी ६ वाजून ३० मिनिटे, सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी, दुपारी ३ वाजून ३० मिनिटे.
तळेगावहून सुटणारी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटे, सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी, दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी, लोणावळाहून सकाळी ७ वाजून २५ मिनिटे, सकाळी ८ वाजून २० मिनिटे, दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

हे रेल्वे उशिराने धावणार…

पुणे-जयपूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्याहून संध्याकाळी पावणे सहा वाजता सुटेल.
दौंड-इंदूर एक्स्प्रेस दौंडहून सायंकाळी सहा वाजता सुटेल.
मुंबई-चेन्नई, लोकमान्य तिलक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद या गाड्यांना पुणे विभागातून धावताना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

दरम्यान, पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानक दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. यात पुणे-कोल्हापूर डेमू एक्स्प्रेस पुणेऐवजी सातारा येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल. त्यामुळे परतीच्या प्रवासात ती गाडी कोल्हापूर ते सातारा अशी धावेल.

सातारा ते पुणे अशी धावणार नाही. शनिवार (ता. १९) चंडीगड-यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड-कुर्डुवाडी-मिरज या बदललेल्या मार्गाने धावेल. रविवारी सकाळी १०. ५५ ते दुपारी १.५५ या दरम्यान हडपसर स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेले आहे.

हा असेल बदल..

पुणे-दौंड डेमू, दौड-पुणे डेमू या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-हबीबगंज ही रेल्वे पुणे स्थानकावरून दुपारी पाच वाजता सुटेल, हैदराबाद-हडपसर ही गाडी दौड स्थानकापर्यंतच धावेल, चेन्नई-कुर्ला ही रेल्वे दौंड, मनमाड मार्गे धावेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!