Pune : आता पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी तीन नवीन प्रस्ताव, उद्योगमंत्र्यांची माहिती…


Pune : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी तीन प्रस्ताव तयार केले आहेत. त्यावर लवकरच केंद्रीय उड्डान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहोत. त्यामध्ये भूसंपादन करण्याच्या तीन प्रस्तावावर आम्ही निर्णय घेऊ, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागातर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी (ता.२९) ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रम आयोजिला होता. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुरंदर विमानतळाबाबत सामंत म्हणाले, ‘विमानतळ भूसंपादन करण्यासाठी जागा आम्ही सरकारने घ्यायची आणि उद्योजकांकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांना द्यायचे, दुसरे उद्योजकांकडून पैसे घ्यायचे व ते शेतकऱ्यांना द्यायचे आणि तिसरे म्हणजे जागा सरकारने घेऊन शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असे तीन पर्याय आहे.

पुण्यातील पुरंदर विमान- तळाचा विषय त्वरित मार्गी लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मेट्रोमार्ग लोकार्पण कार्यक्रमात केली. याबाबत त्वरित बैठक घेण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधि काऱ्यांना भाषणातूनच दिले.

शहराला आणखी एक विमानतळ हवा आहे, असे स्पष्ट करून शिंदे म्हणाले, आता केंद्रीय राज्यमंत्री आपले मुरलीधर मोहोळ आहेत. त्यांच्यासमवेत लगेच बैठक घ्या. आपला शेतकरी गरीब आहे, त्याच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. Pune

त्याला योग्य मोबदला मिळेल असे पहा. त्यासाठीही बैठका घ्या, सरकार या विमानतळाच्या बाबतीत सकारात्मक आहे. पाहिजे ती सर्व मदत करायला सरकार तयार आहे; पण हा नया विमानतळ व्हायला हवा. पुणेकरांना पुण्यातून विमानाने कुठेही जाता यायला हवे.

दरम्यान, पुण्यातील या विमानतळाच्या जागेच्या संपादना- वरून बरेच वाद आहेत. सरकारकडून अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची स्थानिक शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यावरून विमानतळ इथेच व्हावा; तर इथे विमानतळ होऊ दिला जाणार नाही, असे दोन गट तयार झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी दिलेल्या आदेशामुळे रेंगाळत पडलेल्या या विषयाला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!