Pune Porsche case : पुणे अपघात प्रकरणी आरोपीला निबंध लिहायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांना घडली अद्दल, झाली मोठी कारवाई…


Pune Porsche case : पुण्यात कल्याणीनगर परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणाची राज्यासह देशाभरात चर्चा झाली. या प्रकरणात आणखी एक अपडेट आता समोर आली आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तात्काळ जामीन देणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरघाव वेगात पोर्शे कार चालवून अश्विनी कोस्टा व अनिश अवधिया या दोघांना चिरडलं होतं. ही घटना घडल्यानंतर तातडीने मुलाला अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आरोपीला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगत अन्य अटी घालत जामीन मंजूर केला होता. यानंतर समाजमाध्यमातून आणि राज्यातून मोठा संताप पाहायला मिळाला. दरम्यान आता याप्रकरणी शिक्षा सुनावणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. Pune Porsche case

आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य-नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!