Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी महत्वाची माहिती आली समोर, रक्ताच्या नमुन्यात दोघांनी केला वेगळाच कारनामा, नेमकं काय घडलं?


Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर येथील पोर्श अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी दोन आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांनी रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दोघांविरोधात पोलिसांनी २४२ पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या १९ मे रोजी भरधाव पोर्श कारने अभियंता तरुण-तरुणीला जोराची धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

कल्याणीनगर भागातील पोर्श मोटार अपघातप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांविरुद्ध शुक्रवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यात १७ साक्षीदार तपासून २४२ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. सोपानबाग, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. Pune Porsche Car Accident

पोर्श मोटार अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कार चालकासोबत त्याचे दोन अल्पवयीन मित्र होते. या दोघांनी मद्यप्राशन केले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली होती.

रुग्णालयात तिघांचा रक्त नमुना बदलण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, पत्नी शिवानी, अरुणकुमार सिंग, ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी संगनमताने रक्ताचे नमुने बदलल्याचे तपासात समोर आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!