Pune Porsche Accident : पोर्शे अपघातानंतर रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आरोपींनी किती मोजले पैसे? भयंकर माहिती उघड, आता सगळा तपास होणार…


Pune Porsche Accident : पुण्याच्या कल्याणीनगर भागात एक अपघात घडला होता. पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच गाजले. दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्याचे रक्ताचे नमुने बदलण्याचा देखील प्रयत्न केला गेला होता.

आता अपघात प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. अपघातावेळी पोर्शे कारमध्ये मागील बाजूस बसलेल्या त्याचबरोबर कार अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अरुणकुमार देवनाथ सिंगने (वय ४७, रा. विमाननगर) आशिष मित्तल व ससूनमधील डॉक्टरांसह अन्य आरोपींना किती रक्कम देण्यात आली होती.

याची चौकशी आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती तपासली जाणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अरुण कुमार याला पसार होण्यासाठी कोणी मदत केली, याचा तपास करायचा असल्याने त्याच्या पोलिस कोठडीची मागणी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी काल (शुक्रवारी) न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी सिंग याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. Pune Porsche Accident

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १८ मे रोजी मध्यरात्री एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवून एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला.

कारचालक अल्पवयीन मुलगा व पाठीमागील आसनावर बसलेल्या त्याच्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी पबमध्ये जाऊन मद्यपान केलं होतं. अपघात झाल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी अरुण कुमारच्या सांगण्यावरून आशिष मित्तल याने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्याच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला असल्याची माहिती समोर आली होती.

त्यासाठी अरुणकुमारने आशिष मित्तल याला रक्ताचा नमुना बदलण्यासाठी मोठी रक्कम दिली आहे का, डॉ. हाळनोर, डॉ. तावरे, वॉर्डबॉय अतुल घटकांबळे, अमर गायकवाड, व अशपाक मकानदार यांना मदत करण्यासाठी किती रक्कम दिली, याबाबत त्याच्या विविध बँक खात्यातील व्यवहारांची माहिती घेतली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!