पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील आरोपीला न्यायालयाचा दणका; ‘तो ‘अर्ज फेटाळला…


पुणे : पुण्यासह राज्यभरात चर्चेत आलेल्या कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातातील अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे.

आरोपी विशाल अग्रवाल यांने केलेल्या तात्पुरत्या जमिनीच्या अर्जावर न्यायालयाने स्पष्टीकरण दिले आहे. शस्त्रक्रियेचे स्वरुप पाहता आरोपीच्या आईची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य उपलब्ध आहेत. त्यामुळे आरोपीला तात्पुरता जामीन देण्यास कोणताही न्याय्य आधार नाही, असे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा आदेश दिला आहे.तसेच पीडितांच्या हक्कांचा आरोपीच्या हक्कांशी समतोल राखणे आवश्यक आहे, हे लक्षात घेता आरोपीची तात्पुरत्या जामीनावर सुटका करणे हे समाजहितासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचे स्वरुप व शिक्षेची तीव्रता, साक्षी-पुराव्यांशी छेडछाड होण्याची वाजवी भीती आणि जनतेचे व्यापक हित लक्षात घेत आरोपीची तात्पुरत्या जामीनावर सुटका करण्याचे कोणतेही न्याय्य कारण दिसत नाही,’ असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान या अपघाताच्या घटनेनंतर कार चालक मुलगा व त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात विशाल अगरवाल व त्याची पत्नी शिवानीसह एकूण दहा आरोपींवर पुण्याच्या विशेष न्यायालयात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने विशाल अग्रवाल यांना मोठा दणका बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!