हगवणे प्रकरणानंतर पुणे पोलिसांसाचा मोठा निर्णय! शस्त्रपरवाने देण्याला ब्रेक, 400 अर्ज नाकारले,140 अर्ज रद्द…

पुणे : येथील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट शस्त्र परवाना देण्याला ब्रेक लावला आहे. आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले आहेत, तर 140 अर्ज थेट रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने परवाना देणं पोलीस आयुक्ताने पूर्णपणे थांबवलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांना पुणे पोलीस आयुक्तालयातून परवाना मिळाला होता. निलेश चव्हाणसह हगवणे बंधुंनी संबंधित लोकांनी पोलिसांची दिशाभूल करून परवाना मिळवल्याचे समोर आलं होत. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिल्याचं समोर आल होतं. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर समोर आलेल्या माहितीनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी असलेल्या निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना देताना त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, असा अहवाल पुणे पोलिसांनी दिल्याचं समोर आले.
दरम्यान, पुण्यातील शस्त्र परवाना प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोरता आणत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ शस्त्र परवान्यांची तपासणी मोहीम सुरू केली. यामुळे आता अनेकांना गैरमार्गाने घेतलेले परवाने देखील रद्द होतील.
दरम्यान, निलेश चव्हाण पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, पुणे पोलीस आयुक्तालयाकडून तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर निलेश चव्हाणने मंत्रालयात शस्त्र परवाना मिळावा यासाठी अपील केले होते. अशी देखील माहिती समोर आली आहे.