पुणे पोलीस आता आंदेकर गँगचा नायनाट करणार, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, थेट नागरिकांना…

पुणे : पुण्यात शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी, गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेतला.

आयुष कोमकरचा अंत्यसंस्कार सोमवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आला. त्यासाठी त्याचे वडील गणेश कोमकर, जो वनराज आंदेकर हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी आहे, त्याला पॅरोलवर सोडण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी रात्री पुणे गुन्हे शाखेने समृद्धी महामार्गावर बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणातील महत्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. देशमुख यांनी सांगितले की, आतापर्यंत आयुष कोमकर हत्येप्रकरणी एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये यश पाटील आणि अमन पठाण या दोघांनी आयुषवर गोळ्या झाडल्या. तर अमित पाटोळे आणि सुरज मेरगुळ यांनी शस्त्र पुरवणे आणि परिसराची रेकी करण्याचे काम केले.
याशिवाय या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी निलंजय वाडेकर यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमनाथ गायकवाड हे आंदेकर टोळीचे मुख्य लक्ष्य होते.
सध्या या हत्याप्रकरणातील आणखी ५ आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. यासोबतच पोलिसांनी आंदेकर टोळीच्या हितचिंतकांना इशारा दिला आहे. आंदेकर टोळीबाबत कोणी सोशल मीडियावर रिल अपलोड केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आंदेकर गँगविरोधात कोणालाही काही तक्रार द्यायची असल्यास त्यांनी थेट पोलिसांकडे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.