पुणे पोलिसांनी घेतला सर्वात मोठा निर्णय! गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरू..


पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही दिवसांपूर्वी घायवळ टोळीच्या काही जणांनी कोथरुड परिसरात दहशत पसरवली होती. त्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर अन्य एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले होते.

एकाच रात्री दोन अशाप्रकारच्या घटना घडल्याने पुणे शहर हादरलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी घायवळ टोळीच्या साथीदारांना अटकही केली. पण तेव्हापासून घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ मात्र सातत्याने चर्चेत आहे.

कोथरुड प्रकरण घडल्यानंतर निलेश घायवळ ९० दिवसांच्या व्हिजावर भारत सोडून पळाला आहे. सुरुवातीला लंडन आणि त्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये तो पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

       

विशेष म्हणजे परदेशात पळून जाण्यासाठी घायवळने बनावट पासपोर्ट वापरल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं. कोथरूड गोळीबार प्रकरणापासून निलेश घायवळवर पाच गुन्हे दाखल झाले आहेत.तपासात उघड झालं की, निलेश घायवळने बनावट पासपोर्ट वापरून भारतातून पलायन केलं. तो सुरुवातीला लंडनला आणि नंतर स्वित्झर्लंडला गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर घायवळविरोधात आधीच पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

आता पुणे पोलिसांनी या कुख्यात गुंडाविरोधात ब्लू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्यामुळे इंटरपोलच्या मदतीने घायवळला परदेशातून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर घायवळसाठी सुटकेचे सर्व मार्ग बंद होऊ लागले आहेत.

घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. लवकरच त्यावर सुनावणी होणार असून, पासपोर्ट रद्द झाल्यास घायवळचे परदेशातील वास्तव्य अवघड होईल. दरम्यान, त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यावरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं की, घायवळ टोळीविरोधात आणखी काही गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी घायवळविरोधातील मोहिम अधिक वेगवान केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!