यवत हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई ; 22 जणांना अटक, इतर आरोपींचा शोध सुरू..

पुणे : पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणात पुन्हा एकदा भर पडली आहे. शुक्रवारी (१ जुलै) सकाळी एका तरुणाने केलेल्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे संतापाची लाट उसळली.तणाव वाढल्यानंतर दोन गट आमनेसाने आले, परिसरात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. तणावाच्या स्थितीमुळे पोलीस अलर्ट मोडवर आले. या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई परत 22 जणांना अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
यवत गावातील सहकार नगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने शुक्रवारी सकाळी एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दुपारी 12 नंतर गावात तणाव निर्माण झाला. त्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर दुचाकी पेटवल्या तर काही ठिकाणी वाहनांची तोडफोड केली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान यापूर्वीही यवतमध्ये 26 जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता.त्यानंतर 27 जुलै रोजी यवत मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. 31 जुलैला आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता या. मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा केलेल्या पोस्टमुळे अशांतता पसरली.
दरम्यान यवत हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे. एकूण वेगवेगळ्या पाच एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. २२ जणांना मेडिकलसाठी नेण्यात आले आहे. मेडिकल झाल्यानंतर त्यांना दौंड कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलिसांची सहा पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे. एकूण ५० पेक्षा जास्त जणांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.