Pune Police MCOCA Action : लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अभिजीत आहेरकर व त्याच्या ४ साथीदारांवर मोक्का, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ८३ वी संघटीत मोक्का कारवाई..


Pune Police MCOCA Action : लोणी काळभोर परिसरात कोयत्याने मारहाण करुन दहशत पसरवणाऱ्या अभिजीत आहेरकर व त्याच्या इतर ४ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमारयांनी पदभार स्वीकारल्यापासून ८३ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख अभिजीत अभिमन्यु आहेरकर (वय. २२ रा. लोणी काळभोर), अभिषेक दत्तात्रय रामपुरे (वय. २० रा. आल्हाट चाळ, कदमवाक वस्ती), प्रथमेश गणेश आयरे (वय. १९ रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) यांना अटक केली आहे. तर प्रणव भारत शिरसाठ, गौरव गोपीचंद बडदे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

गाडी निट बघून चालवता येत नाही का असे बोलल्याच्या कारणावरुन चार ते पाज जणांनी एका तरुणावर कोयता व रॉडने वार केले. तसेच त्याच्या मित्राच्या हातावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार 25 सप्टेंबर रोजी रात्री लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. Pune Police MCOCA Action

याप्रकरणी आरोपींवर आयपीसी ३०७, ३२६, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९ आर्म ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी तपास करून आरोपीना अटक कर्ली आहे.

आरोपी अभिजीत आहेरकर याने गुन्हेगारांची टोळी तयार केली. टोळीचे वर्चस्व तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी लोणी काळभोर व परिसरातील गावामध्ये पिस्टल व शस्त्राचा वापर दहशत निर्माण केली.

आरोपी अभिजीत आहेरकर याच्यावर २०१९ पासून ६ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पिस्टल बाळगणे, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला करण्यासाठी हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत करणे, गर्दी मारामारी, मालमत्तेचं नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी परिमंडळ- ५ पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.

या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!