Pune Police MCOCA Action : पिस्तूलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिलकसिंग टाकसह साथीदारांवर मोक्का, आयुक्त रितेश कुमार यांची 67 वी संघटीत मोक्का कारवाई..!!
Pune Police MCOCA Action पुणे : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या तसेच पिस्तूलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिलकसिंग टाक व त्याच्या १० साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आतापर्यंत ६७ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. Pune Police MCOCA Action
फिर्यादी हे चंदवाडी कॅनोल रोडने घरी जात असताना कारमधून व दुचाकीवरुन आलेल्या ६ जणांनी त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. Pune Police MCOCA Action
तसेच त्यांच्या खिशातील पैशांचे पाकिट जबरदस्तीने कढून घेतले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली, कोणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकी फिर्यादी यांना दिली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिलेखावरील अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय. २१ रा. घरकुल मांजरी-बुद्रुक, हडपसर), बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड (वय. २५ रा. वैदवाडी, पुणे), कन्वरसिंग काळुसिंग टाक, रामजितसिंग रणजितसिंग टाक (वय.२१ दोघे रा. तुळजा भवानी वसाहत, हडपसर) यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्यात टोळी प्रमुख तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय. २८ रा. रामटेकडी, हडपसर), अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय.२५ गल्ली नं. ७ हडपसर), करणसिंग रजपुतसिंग दुधाणी (रा. राम नगर, हडपसर), लखनसिंग राजपुतसिंग दुधाणी (रा. रामटेकडी, हडपसर), राहुल रविंद्रसिंग भोंड (रा. तुळजा भवानी वसाहत, हडपसर), सोहेल जावेद शेख (रा. बिराजदार नगर, गोसावी वस्ती, हडपसर) हे फरार आहेत.
टोळी प्रमुख तिलकसिंग टाक याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन हडपसर, रामटेकडी, आनंदनगर, वानवडी या भागात टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी साथीदारांसह गुन्हे केले आहेत. आरोपींनी घातक शस्त्र बाळगुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी, वाहन चोरी करणे.
दहशत निर्माण करणे, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना कोयते दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणे, लहान व्यावसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करुन फुकट वस्तू घेऊन जाणे असे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत.
या टोळीवर पुणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीची हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत आहे.
दरम्यान, हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी परिमंडळ- ५ पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.