खडसेंच्या जावयाबाबत पुणे पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा, कोर्टात नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात काल (शनिवारी) रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावली. यावेळी पोलिसांकडून चार पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये दोन तरुणींचा देखील समावेश आहे. छापेमारीत पोलिसांना घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हुक्का साहित्य आणि मद्य आढळल्याची माहिती मिळाली आहे. या कथित रेव्ह पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई, रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह एकूण सात आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
ड्रग्स पार्टी प्रकरणी प्रांजल मनिष खेवलकर (वय. ४१), निखिल जेठानंद पोपटाणी (वय. ३५), समीर फकीर महमंद सय्यद (वय ४१) सचिन सोनाजी भोंबे (वय ४२), श्रीपाद मोहन यादव (वय. २७) ईशा देवज्योत सिंग (वय. २२), प्राची गोपाल शर्मा (वय. २५) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ७ जणांकडून कोकेन सदृश पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आरोपींकडून ४१ लाख रुपये ज्यामध्ये २.७० ग्रॉम कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॉम गांजा सदृश पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट आणि दारू व वियरच्या बॉटल, हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले आहेत. खराडी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) (11) अ, २१ (ब),२७ कोटपा ७ (२), २०(२), प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकनाथ खडसे यांच्या जावयाविषयी अर्थात प्रांजल खेवलकर यांच्याविषयी पुणे पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक बाबी सांगितल्या. प्रांजल खेवलकर हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचा पुणे पोलिसांनी दावा केला आहे.
आरोपी प्रांजल खेवलकर यांनी रेव्ह पार्टीसाठी एकूण ३ रूम बुक केल्या होत्या. हॉटेलच्या आवारातून तीन व्यक्ती येऊन गेल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान मिळाली असून त्यांचा शोध घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करावयाची आहे, असे पोलिसांनी सांगितले. तसेच याच तिघांनी अमली पदार्थ (ड्रग्ज) दिल्याचा संशय पोलिसांना आहे.