Pune : तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावावा, जिल्ह्यात ठिकठिकाणी रॅली काढून समाजकल्याण विभागाकडून जनजागृती..
Pune : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयामध्ये वास्तव्यास असणाऱ्या तृतीयपंथीय (पारलिंगी) नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी, त्यांनाही संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावता यावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे समाज कल्याण विभाग आणि सावली सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. Pune
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक आयोगाने केले आहे. कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता निवडणूक विभाग घेत आहे.
पारलिंगी (तृतीयपंथीय ) व्यक्तींना मतदार कार्ड व त्याचे महत्व याविषयाबाबत माहिती देऊन सर्वसामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणे तुम्हीही या देशाचे समान नागरिक असल्याने तुम्ही देखील मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता व या देशाचे सुजान नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू शकता.
त्यामुळे तुम्ही स्वतः व तुमच्या ओळखीच्या पारलिंगी व्यक्तींनी मोठ्या संख्येने या अभियानामध्ये सहभाग घेऊन येणा-या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले अमुल्य मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजातील नेहमी दुर्लक्षित असलेला तृतीयपंथीय नागरिक मतदानापासुन वंचित राहिला आहे.
त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुणे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार पिनेकल हाऊसिंग सोसायटी, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन जवळ, पंचशिल चौक पासून ते भाजी मार्केट सिध्देश्वर मंडई चौक प्रायव्हेट रोड या मार्गावर मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली आहे.