Pune : रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट, सायबर गुन्हे शाखेकडून तीनजण ताब्यात..


Pune : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, सांगली), वसंत रमेशराव खुळे (रा. रहाटी, जि. परभणी), प्रदीप कणसे (रा. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. Pune 

मिळालेल्या माहिती नुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील अश्लील मजकूर लिहून टीका केली होती.

तांत्रिक तपासात रणजीतराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील नावाने खाते चालविणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जयंत पाटील याला नोटीस बजावून जबाब नोंदविण्यात आला असून त्याच्या मोबाइल संच जप्त करण्यात आला, तसेच वसंत खुळे, प्रदीप कणसे यांना नोटीस बजाविण्यात आली असून, त्यांचे मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!