Pune News : सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन…
Pune News पुणे : पुणे जिल्ह्यातील आजी, माजी सैनिकांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे आयोजन तहसिल कार्यालयात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. Pune News
शिरूर तालुका २६ ऑक्टोबर, इंदापूर तालुका ३१ ऑक्टोबर, पुरंदर तालुका १ नोव्हेंबर, मावळ तालुका २ नोव्हेंबर, मुळशी तालुका ३ नोव्हेंबर, बारामती तालुका ७ नोव्हेंबर, खेड तालुका ८ नोव्हेंबर, हवेली व पुणे शहर ९ नोव्हेंबर, भोर तालुका १६ नोव्हेंबर, दौंड तालुका १७ नोव्हेंबर, जुन्नर तालुका २० नोव्हेंबर, आंबेगाव तालुका २१ नोव्हेंबर तर वेल्हे तालुक्यात २२ नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व ठिकाणी सकाळी ११ वाजता बैठक सुरू होईल.
बैठकीत ध्वजदिन २०२२ चा निधी संकलनाचा आढावाही घेण्यात येणार आहे. तसेच बैठकीस तालुक्याचे गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील आजी, माजी सैनिकांनी तालुकापातळीवरील अडीअडचणी असल्यास संबंधित तहसिलदार कार्यालयामध्ये बैठकीच्या दिवशी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) एस. डी. हंगे यांनी केले आहे.