Pune News : तरुणी पार्टीवरुन घरी निघाली, नराधमांनी मदतीच्या बहाण्याने केला बलात्कार, पुण्यात धक्कादायक घटना..


Pune News पुणे : एकेकाळी विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी घटनांसाठी चर्चेत आहे. पुणे आणि परिसरात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. Pune News

पार्टी करुन घरी निघालेल्या तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

दत्तात्रय खरात (वय. २८, रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, विमाननगर भागात बॅकयार्ड कॅफे आहे. तरुणी, तिची मैत्रीण, दोन मित्र गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी तेथे गेले होते. उपाहारगृहात दहा हजार रुपयांचे बिल झाले. तरुणीने डेबिट कार्डद्वारे बिल अदा करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, डेबिट कार्डच्या सांकेतिक शब्दात चूक झाल्याने बिल अदा होऊ शकले नाही. त्यानंतर उपाहारगृहातील व्यवस्थापक आणि कामगारांनी तरुणीला शिवीगाळ करुन दोन मोबाइल संच, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबीट कार्ड ताब्यात घेतले. बिल भरल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू परत करेल, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर तरुणी उपाहारगृहात थांबली. त्यावेळी उपाहारगृहातील एका ग्राहक तरुणाने तरुणीला मदत करण्याचा बहाणा केला. तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन खराडी भागातील एका हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर त्याने बलात्कार केला.

तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी खरात याला अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!